कामोठे : रामप्रहर वृत्त
भाजप वैद्यकीय सेल कामोठे मंडलतर्फे राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळाचे आयोजन मंगळवारी (दि. 28)करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशोदा हॉस्पिटलचे डॉ. बाळासाहेब खड्बडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, मंडल सरचिटणीस सुशील शर्मा, शरद जगताप, डॉ. अनिल पराडकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष नाना मगदूम, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, विजय लोखंडे, उत्तम जाधव, प्रवीण मालवीया, साधना आचार्य, वनिता पाटील, सुरेंद्र हल्लीकर आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन कामोठे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी केले होते.