Breaking News

पेण-जावळी एसटी सेवा सुरू करा

पेण : प्रतिनिधी

तालुक्याच्या जावळी भागातील एसटी बससेवा अद्यापही नियमित सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदारांना त्रास सहन करावा लागत आहे.

या भागातील बहुतांश ग्रामस्थांना कंपनीत, तसेच महिलांना काम करण्यासाठी शहरात जावे लागत असते. एसटी सेवा बंद असल्याने खाजगी वाहनाने परवडत नाही. त्यामुळे त्यांनी पेण-जावळी एसटी सेवा नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या जावळी भागातील एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने अनेक मार्गावर बस सुरू केल्या आहेत.

मात्र पेण तालुक्याच्या जावळी भागातील एसटी बससेवा अजूनही नियमित सुरू झालेली नाही. खाजगी वाहनांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे नोकरदार, तसेच विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे. नोकरदार व ग्रामस्थांना नियमित शहरात जावे लागते, तसेच क्लासेस, शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शहरात यावे लागते, मात्र एसटी बस सुरू नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जावळी भागातील बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

जावळी भागातील लोकांची गैरसोय लक्षात घेता त्या भागातील गाड्यांच्या फेर्‍यांचे नियोजन करून त्या लवकरात लवकर सुरू करण्यात येतील.

-अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक रायगड

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply