Breaking News

नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्यातर्फे कामगारांचा गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रभाग समितीचे माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी महापालिकेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत प्रभाग क्र.04 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कामगारांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपत्र व पुष्प देऊन त्यांचा गौरव केला.

या वेळी महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक अतूल मोहकर,श्री.संदीप भोईर, सुपरवायझर विश्वास पाटील, भाजप युवा नेते नितेश अभिमन्यू पाटील, काशिनाथ घरत, श्रीकांत पाटील, अतुल पाटील, महेंद्र पाटील, मयुर घरत, अनिकेत पाटील, निकेश पाटील, रोहिदास उंदीर पाटील, बंट्टी ढाकसे आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply