गांधीनगर ः गुजरातमधील गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे, तर काँग्रेस व आम आदमी पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपने 44 पैकी 41 जागांवर विजय मिळवत निर्विवादपणे आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्या आणि आपला फक्त एका जागेवरच समाधान मानावे लागले. या महापालिका निवडणुकीत 11 वॉर्डामधील 44 जागांसाठी एकूण 162 उमेदवार रिंगणात होते. येथील महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. एससी प्रवर्गाच्या सर्व पाच जागांवर भाजपने विजय मिळवलेला आहे. महापालिका निवडणुकीचे मतदान रविवारी झाले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. 5) मतमोजणी झाली. यात भाजपने एकतर्फी विजय मिळविला आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …