नगरसेवक राजेश म्हात्रे यांचा पुढाकार
पेण : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष व पेण शहर मल्याळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून पेण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सफाई अभियान राबविण्यात आले.
नगरसेवक राजेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने पेण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राबविण्यात आलेल्या या सफाई अभियानात मल्याळी समाजाचे पेण अध्यक्ष श्यामभाई, मोहन नायर, सजीस नायर, श्रीकांत नायर, सौरभ नायर, वर्गिस भाई यांच्यासह भाजप व मल्याळी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणार्या कामगारांचा नगर परिषदेचे सभापती राजेश म्हात्रे, भाजपचे पेण शहर सरचिटणीस राकेश म्हात्रे, चिटणीस अजित पाटील व जमीर खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.