Breaking News

मुरूडमध्ये सातबारा उतार्याचे घरोघरी वितरण

मुरूड : प्रतिनिधी

सातबारा म्हणजे मालकी हक्क दाखवणारा दस्ताऐवज असून त्याचे सर्वांनी व्यवस्थित जतन करावे. त्याचप्रमाणे दरवर्षाला नवीन सातबारा काढून आपल्या मालमत्तेमध्ये इतरांचा समावेश तर झाला नाही ना, याची खातरजमा करावी, असे प्रतिपादन मुरूडचे निवासी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड तालुक्यात  डिजिटल भूमी अभिलेख अधुनिकीकरण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार तालुक्यातील एकदरा, उंडरगाव, टोकेखार, कोर्लई, सुरई, मीठेखार साळाव, तळेखार, वेळास्ते या गावांत 2 ऑक्टोबर रोजी डिजिटल सातबारा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी निवासी नायब तहसीलदार सानप शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत होते.

नायब तहसीलदार गोविंद कुटुंबे, जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ, एकदरा सरपंच रामकृष्ण आगरकर, मंडळ अधिकारी विजय मापुस्कर, नांदगाव मंडळ अधिकारी संजय तवर, बोर्ली मंडळ अधिकारी  लक्ष्मण शेळके, तलाठी रेश्मा वीरकुड, सपना वायडे, तलाठी मुरुड रुपेश रेवस्कर यांच्यासह शेतकरी या वेळी  उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply