Breaking News

एक्स्प्रेस वेवर दोन चालकांचा मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर बुधवारी (दि. 6) सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत दोन चालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात एक टेम्पो व एक ट्रक चालक आहे. पुढील वाहनास धडक दिल्याने जबर जखमी होऊन टेम्पोचालकाचा तर ट्रक टर्मिनलमध्ये विश्रांती घेण्यासाठी थांबला असताना ट्रकचालकाचा झोपेत मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

एक्स्प्रेस वेवर किलोमीटर 36:500 मुंबई लेनवर   बुधवारी सकाळी पुढच्या ट्रकला एक टेम्पो पाठिमागून धडकला. यात टेम्पो चालक रहेमान मनाल शेख (वय 41, रा. मुंबई) हा  गंभीर जखमी अवस्थेत अडकून पडला होता. खूप मेहनतीनंतर टेम्पो चालकाला बाहेर काढण्यात यश मिळाले,  मात्र या दरम्यान त्या चालकाचा मृत्यू झाला होता. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, लोकमान्य हॉस्पिटलच्या टीमने अडकलेल्या मृत चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

दुसरी घटना एक्स्प्रेस वेवरील निशीसागर फूड मॉल जवळील ट्रक टर्मिनस येथे घडली. ट्रक विश्रांतीसाठी थांबला असताना ट्रकचालक तुलसीकुमार दोमोदरन  (वय 48, रा. तकलुपूर, कर्नाटक) हा केबिनमध्ये मृतावस्थेत आढळला. झोपेतच त्याचा मृत्यू झाला असण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply