जलतरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष परेश ठाकूर यांच्याकडून अभिनंदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
47व्या ज्युनियर व 74व्या सिनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी पेणमधील अथर्व लोधी आणि महंत म्हात्रे या दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा कर्नाटकमधील बंगळुरू येथे होणार असून त्याबद्दल अथर्व आणि सिनिअर संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झालेल्या पांडुरंग म्हात्रे यांचे रायगड जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन केले आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे या वेळी अथर्वला तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेच्या ज्युनियर गटात 50 मीटर फ्री स्टाइल व 50 मीटर ब्रेस्ट या दोन इव्हेंटसाठी अथर्व लोधी याची, तर सिनिअर राष्ट्रीय जलतरण
स्पर्धेतील वॉटर पोलो या इव्हेंटसाठी महंत म्हात्रे याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सिनिअर संघाचे व्यवस्थापक म्हणून रायगड जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव पांडुरंग म्हात्रे यांची निवड झाली आहे. जलतरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, उपाध्यक्ष व नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नगरसेवक अजय बहिरा, युवा नेते मयूरेश नेतकर उपस्थित होते.