Breaking News

वीज पडून खांडस गावातील शेतकरी जखमी

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील खांडस गावातील हिरामण मारूती ऐनकर या शेतकर्‍याच्या अंगावर  मंगळवारी (दि. 5)  संध्याकाळी वीज पडली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याचवेळी तेथील विठ्ठल रखुमाई मंदिरावरही   वीज पडली, त्यात मंदिराचा काही भाग कोसळून नुकसान झाले आहे.

खांडस गावातील हिरामण ऐनकर आणि त्याचा भाऊ पंढरीनाथ ऐनकर हे गावापासून 100 मीटर अंतरावरील आपल्या शेतात गुरे घेऊन गेले होते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या भागात विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी हिरामण यांच्या वीज कोसळली. त्यात ते भाजले गेले.त्यांना तात्काळ खांडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. खांडस गावात असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरावरही वीज पडली. त्यात मंदिराचे मोठे नुकसान झाले. मात्र कोणताही जीवीतहानी झालेली नाही.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply