Breaking News

वीरू, मुरली, संजूच्या पंगतीत रहाणेने मिळविले स्थान

मुंबई : वृत्तसंस्था

जयपूरला झालेल्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर अजिंक्य रहाणे याने तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले. अजिंक्य रहाणेचे हे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. याबरोबरच आयपीएलमध्ये एकापेक्षा अधिक शतक ठोकणार्‍या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने स्थान मिळवले.

या यादीत विराट कोहली पाच आयपीएल शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी दोन शतके ठोकली आहेत. या यादीत रहाणेला स्थान मिळाले आहे. या आधी सात वर्षांपूवी रहाणेने एकमेव आयपीएल शतक झळकावले होते. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात 15 एप्रिल 2012 रोजी त्याने 60 चेंडूंत नाबाद 103 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता त्याने पुन्हा एकदा शतक झळकाविले.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply