Breaking News

स्कॉटलंडच्या या खेळाडूचे 25 चेंडूत शतक

स्कॉटलंड : वृत्तसंस्था

स्कॉटलंड फलंदाज जॉर्ज मुंसे याने अवघ्या 25 चेंडूत शतक ठोकत ऐतिहासिक खेळी केली आहे. ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनमधून खेळताना मुंसेने ही कामगिरी केली आहे. याशिवाय सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याचा पराक्रमही त्याने केला.

जॉर्ज मुंसे ग्लोसेस्टरशायर सेकंड इलेव्हनकडून खेळताना बाथ सीसी संघाविरुद्ध टी-20 सामन्यात 39 चेंडूत 147 धावा ठोकल्या. मुंसेच्या खेळीमध्ये 20 षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. मुसेंसोबत जीपी विलोजने देखील 53 चेंडूत शतक ठोकलं. 26 वर्षीय मुंसेने 2017 मध्ये हाँग-काँगविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. स्कॉटलंडकडून मुंसेने 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 16 सामन्यांमध्ये मुंसेने 72.02 च्या स्ट्राईक रेटने 381 धावा केल्या आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply