Breaking News

भाजपतर्फे बालई गावामध्ये मोफत कोरोना लसीकरण

उरण : वार्ताहर

प्रत्येक गाव कोविड मुक्त व्हावा यासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्ष बालईतर्फे बालई गावामध्ये मोफत कोरोना लसीकरण कार्यक्रम झाला. लस घेतलेल्या 125 नागरिकांना भाजप बालई गाव अध्यक्ष महेश माळी यांच्या वतीने एक किलो साखर, एक फ्रुटी, आणि एक बिसलरी पाण्याची बाटली देण्यात आली.

बालई गावातील व आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांनी लसीकरणाला उत्फुर्त प्रतिसाद दिला. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, सरचिटणीस सुनील पाटील, जिल्हा अल्पसंख्याक उत्तर रायगड अध्यक्ष जसीम गॅस, नगरसेवक मेराज शेख, उरण युवा शहर अध्यक्ष निलेश पाटील, महिला शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, बालई गाव अध्यक्ष महेश माळी, राजेश म्हात्रे, भारत पाटील, प्रितम पाटील, समिल पाटील, अरुण पाटील, योगेश म्हात्रे, दिलीप पाटील, हेमंत भोम्बले, प्रशांत माळी व ग्रामस्थ बालई उपस्थित होते. लाभार्थी लसधारकांनी या वेळी भाजप, डॉक्टर्स व त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद दिले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply