उरण : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तालुका विधी सेवा समिती, उरण यांच्या विद्यमाने कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी उरण तहसील कार्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अॅड. धीरज डाकी यांनी लोकअदालतबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका नामदेव पठाडे यांनी नालसा अंतर्गत येणार्या विविध योजनांचे महत्व पटवून दिले. तालुका विधी सेवा समिती, उरण यांचे मार्फत कायदेविषयक जनजागृती करत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
या शिबिरामध्ये उरण न्यायालयातील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका पठाडे, उरण तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, नायब तहसीलदार धुमाळ, अॅड. पराग म्हात्रे, अॅड. किशोर ठाकूर, अॅड. नितेश म्हात्रे, अॅड. अनुराग ठाकूर, अॅड. गीता पाटील, उरण न्यायालयातील विधिज्ञ, तहसील कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अॅड. पराग म्हात्रे यांनी शिबिराचे सूत्रसंचालन करून उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.