सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती
कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे येथे प्रदिप भगत युवा मंच यांच्या वतीने व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका अरुणा भगत व समाजसेवक प्रदिप भगत यांच्या माध्यमातून आधार कार्ड शिबीर शनिवारी (दि. 9) आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत अरुण भगत आणि प्रदिप भगत यांच्या माध्यमातून सुरू असलेले काम हे कौतुकस्पद असल्याचे म्हटले.
प्रदिप भगत आणि नगरसेविका अरुणा भगत यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ‘प्रदिप भगत युवा मंच कामोठे’ यांच्या वतीने कामोठे मधील प्रभाग क्रमाक 11 मधील रहिवाश्यांसाठी आधार कार्ड शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हे शिबिर गुरुवार (दि. 14) पर्यंत सुरू राहणार आहे. या शिबिरावेळी सुकन्या योजनेची माहिती देण्यात आली असून, प्रदिप भगत यांनी प्रभागातील 10 वर्षांखालील 50 मुलींचे सुकन्या समृध्दी योजने अंतर्गत खाते खोलून त्याचा प्रथम हफ्ता भरला.
या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, नगरसेविका अरुणा प्रदिप भगत, सजामसवेक प्रदिप गजानन भगत, भाजपचे शहर अध्यक्ष रवि जोशी, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, सरचिटणीस स्वाती केंद्रे, सदस्या दिपाली तीवारी, मनोज मादळे, दत्तात्रेय वाफारे, सुयोग वाफारे, गणेश भगत, शैलेश परबळकर, मनमीत सिंग, अक्षय महाडीक, मयंक सिंग, सचिन यमगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबीरात समाजसेवक प्रदिप भगत यांनी 10 वर्षा खालील 50 मुलींचे खाते खोलून त्यांच्या पहिल्या हफ्ता भरल्याबद्दल त्यांचे उपस्थित मान्यवरांनी आभार मानले.