Breaking News

नेरळ रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी लिफ्टची उभारणी

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जतकडील नेरळ रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी उद्वाहन बसवले जाणार आहे. या उद्वाहनाचे फ्लॅट 2 वरील काम 80 टक्के पूर्ण झाले असून फ्लॅट एकवरील उद्वाहनाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

नेरळ या जंक्शन रेल्वेस्थानकातून माथेरानकरिता मिनीट्रेनचा नेरळ-माथेरान-नेरळ असा प्रवास सुरू होतो. त्यामुळे पर्यटक प्रवाशांची मोठी गर्दी या रेल्वेस्थानकात नेहमी असते. त्यात मध्य रेल्वेकडून मागील दोन वर्षांत बनवण्यात आलेले पादचारी पूल यांची उंचीही महिला प्रवासी आणि वयोवृद्ध प्रवासी यांची दमछाक करणारी ठरत आहे. त्यामुळे नेरळ प्रवासी संघटना आणि स्थानिक प्रवाशांनी नेरळ रेल्वेस्थानकात सरकते जिने आणि उद्वाहन उभारण्याची मागणी केली होती.

नेरळ रेल्वेस्थानकात पादचारी पुलाला लागून उद्वाहन उभारण्याची प्रक्रिया सुरू असून फलाट 2वरील एका बाजूच्या उद्वाहन कक्षाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. त्यानंतर फलाट एकवरील उद्वाहन उभारण्याचे काम सुरू होणार आहे, तर दुसर्‍या टप्प्यात रेल्वेस्थानकात सरकत्या जिन्याचे काम केले जाणार आहे. या उद्वाहनामुळे नेरळ रेल्वेस्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे जाणार आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply