Breaking News

कर्जत पालिकेचे रोड व्हॅक्युम स्विपर मशीन एक वर्षानंतर दिसले रस्त्यावर

कर्जत : प्रतिनिधी

नगर परिषदेने आरोग्य विभागासाठी एक वर्षापूर्वी  रोड व्हॅक्युम स्विपर मशीन घेतले होते. तिचे लोकार्पणही झाले, मात्र ती रस्त्यावर कधीच दिसली नव्हती. तब्बल एक वर्षांनंतर ही मशीन बुधवारी (दि. 13) कर्जत शहरातील रस्ते साफ करताना दिसले.

कर्जत नगर परिषद हद्दीतील बहुतांश रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. हे रस्ते स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेने 47 लाख 33 हजार रुपये खर्च करून रोड व्हॅक्युम स्विपर मशीन खरेदी केली. या मशीनद्वारे रस्त्यावरील धूळ साफ करण्यात येणार होती. 20 मे 2020 रोजी या मशीनचे लोकार्पण झाले होते, मात्र नंतर तांत्रिक कारणामुळे ही मशीन रस्त्यावर कधी फिरली नाही.

काही दिवस ही मशीन नगर परिषद कार्यालयाजवळ उभी होती, मात्र एक वर्षाच्या कालावधीनंतर बुधवारी ही मशीन शहरातील रस्ते साफ करताना दिसली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply