महाड : प्रतिनिधी
राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमधील सफाई कामगारांचा भाजपकडून सन्मान करण्यात आला.
महाडमध्ये 22 जुलै 2021 रोजी महाप्रलय आला होता. त्यानंतर संपूर्ण शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता महाड शहर स्वच्छ केले होते. भाजपने विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाड नगर परिषदेच्या सफाई कामगारांचा साहित्य देऊन सन्मान केला.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, महाड तालुका उपाध्यक्ष चंद्रजीत पालांडे, तालुका सरचिटणीस महेश शिंदे, संदीप ठोंबरे, मंजुशा कुद्रीमोती, वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष नाना पोरे, निलेश तळवटकर, तुषार महाजन, आपा सोंडकर, सुमीत पवार, सुमेध भोसले, वैष्णवी भोसले आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.