Breaking News

शिवभक्तांनी बांधले अलिबागच्या कुलाबा किल्ल्याला तोरण

अलिबाग : प्रतिनिधी

इतिहासाची साक्ष म्हणून अलिबाग समुद्रात उभा असलेल्या कुलाबा किल्ल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (दि. 15) शिवभक्तांनी गोंड्याच्या फुलांचे तोरण बांधले. तसेच किल्ल्यातील तोफांचेही यथासांग पूजन केले.

अलिबागमधील गडवाट प्रवास सह्याद्रीचा, स्वराज्याचे शिलेदार, मावळा प्रतिष्ठान या संस्थांचे सदस्य दरवर्षी कुलाबा किल्ल्याला तोरण बांधून आणि शस्त्रपूजन करून दसरा सण साजरा करतात. किल्ल्याचा इतिहास नव्या पिढीला समजावा, किल्ल्याचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने हे शिवभक्त एकत्रित येऊन आपले कार्य करीत असतात.

कुलाबा किल्ला हा सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचे प्रमुख ठिकाण होते. काळानुरूप काही भागात कुलाबा किल्ल्याची पडझड झाली आहे, असे असले तरी किल्याचे प्रवेशद्वार आजही मजबूत आहे. मावळा प्रतिष्ठान, गडवाट प्रवास सह्याद्रीचा, स्वराज्याचे शिलेदार या संस्थांच्या सदस्यांनी शुक्रवारी कुलाबा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर तसेच बुरुजावरही गोंड्याच्या फुलांचे तोरण लावले. तोफा व शस्त्रांचेही पूजन केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply