Breaking News

ऑस्ट्रेलियाची द. आफ्रिकेवर मात

आबुधाबी ः वृत्तसंस्था

ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात चाहत्यांना थरार अनुभवायला मिळाला. जोश हेझलवूडची (2/19) प्रभावी गोलंदाजी आणि मार्कस स्टोयनिसच्या (16 चेंडूंत नाबाद 24 धावा) निर्णायक फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून सरशी साधली. आफ्रिकेने दिलेले 119 धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 19.4 षटके घेतली. आफ्रिकेच्या वेगवान मार्‍यापुढे त्यांची एक वेळ 3 बाद 38 धावा अशी अवस्था झाली होती. कर्णधार आरोन फिंच (0), डेव्हिड वॉर्नर (14) आणि मिचेल मार्श (11) यांना छाप पाडता आली नाही, परंतु स्टीव्ह स्मिथ (35) आणि ग्लेन मॅक्सवेल (18) यांनी चौथ्या गड्यासाठी 42 धावांची भर घालून डाव सावरला, मात्र दोघेही लागोपाठच्या षटकांत माघारी परतल्यावर स्टोयनिसने सामन्याची सूत्रे हाती घेतली. सहा चेंडूंत आठ धावांची गरज असताना स्टॉयनिसने दोन चौकार लगावत ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. तत्पूर्वी हेझलवूडसह अन्य गोलंदाजांनी टिचून मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला 9 बाद 118 धावांत रोखले. त्यांच्याकडून फक्त एडिन मार्करमने (40) एकाकी झुंज दिली. हेझलवूडने क्विंटन डीकॉक (7) आणि र्‍हासी व्हॅन डर दुसेन (2) यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले. त्याला अ‍ॅडम झम्पा आणि मिचेल स्टार्क यांनीही प्रत्येकी दोन बळी मिळवून उत्तम साथ दिली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या गटात गुणांचे खाते उघडले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply