Breaking News

मँचेस्टर युनायटेड संघ आयपीएल खेळणार

मँचेस्टर ः वृत्तसंस्था

आयपीएल 2022 स्पर्धेत दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी फुटबॉलमध्ये प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मॅनचेस्टर युनायटेडने रूची दाखवली आहे. मॅनचेस्टर युनायटेडचे मालक ग्लेजर कुटुंबीयांनी नवी फ्रेंचाइसी विकत घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. ग्लेजर कुटुंबीयांनी एका खासगी इक्विटी कंपनीच्या माध्यमातून आयपीएल संघ बनवण्याचे दस्ताऐवज विकत घेतले आहेत, असे वृत्त समोर आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नव्या संघांच्या निविदेची शेवटची तारीख वाढवून 20 ऑक्टोबर केली होती. निविदा जाहीर करताना बीसीसीआयने आपली नियमावली स्पष्ट केली होती. संघ मालकाची संपत्ती 2500 कोटी रुपये किंवा कंपनीची उलाढाल तीन हजार कोटी रुपये असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने नियमात विदेशी कंपन्यांना संघ खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे. जर विदेशी कंपनीला निविदा मिळाली तर त्यांना भारतात कंपनी प्रस्थापित करावी लागेल. नवी टीम खरेदी करण्याच्या शर्यतीत अदानी ग्रुप, टोरेंट फार्मा, ऑरोबिंदो फार्मा, आरपी संजीव गोयंका ग्रुप, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, जिंदाल स्टील, रॉनी स्क्रूवाला आदी आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply