नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 24) मन की बात कार्यक्रमात बोलताना देशातील कोरोना लसीकरणातील योगदानासाठी आरोग्य कर्मचार्यांचे भरभरून कौतुक केले. आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाही हे मला माहीत होते, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले, तसेच भारतातील लसीकरण कार्यक्रमाच्या यशातून भारताची आणि सर्वांच्या प्रयत्नांची शक्ती दिसते, असेही त्यांनी नमूद केले. येत्या रविवारी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. ‘मन की बात’च्या प्रत्येक श्रोत्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी लोहपुरुषाला नमन करतो. यानिमित्ताने एकतेचा संदेश देणार्या कोणत्या ना कोणत्या उपक्रमात सहभागी होणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …