Breaking News

अफगाणिस्तानचा दणदणीत विजय; स्कॉटलंडची शरणागती

शारजा ः वृत्तसंस्था

मुजीब उर रहमान (5/20) आणि रशीद खान (4/9) या फिरकी जोडीसमोर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषकात सोमवारी झालेल्या सुपर-12 सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल 130 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव अवघ्या 60 धावांत संपुष्टात आला. तीन षटकांत बिनबाद 27 धावा झाल्यानंतर मुजीबने चौथ्या षटकात तीन बळी मिळवून स्कॉटलंडच्या डावाला खिंडार पाडले. मग रशीदने शेपटाला गुंडाळले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 4 बाद 190 अशी धावसंख्या  उभारली. मोहम्मद शहझाद (22) आणि हश्मतुल्ला झझई (44) दमदार सलामी दिल्यावर नजीबुल्ला झादरानने (59) गुरबाजसह (46) दणदणीत 87 धावांची भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक # अफगाणिस्तान : 20 षटकांत 4 बाद 190 (नजीबुल्ला झादरान 59, रहमनुल्ला गुरबाज 46; साफीयान शरीफ 2/33) विजयी वि. स्कॉटलंड : 10.2 षटकांत सर्व बाद 60 (जॉर्ज मुन्सी 25; मुजीब उर रहमान 5/20, रशीद खान 4/9). सामनावीर : मुजीब.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply