Breaking News

उरण नगर परिषदेतर्फे जनजागृतीपर सायकल रॅली

उरण : वार्ताहर

माझी वसुंधरांतर्गत पर्यावरण संतुलन आणि स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार उरण नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे व मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये सायकल रॅलीद्वारे जनजागृती करून अभियान राबविण्याबाबत प्रचार व प्रसार करण्यात आला. कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करण्यात आले. सकाळी 10 वाजता उरण नगरपरिषद येथून नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. पुढे रामरतन शामियाना, कामठा, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका  राघोबा मंदिर, जरीमरी मंदिर, बाजार पेठ, पोलीस स्टेशन, मुस्लीम मोहल्ला, वाणी आळी, वैष्णवी हॉटेल, स्वामी विवेकानंद चौक, एन आय हायस्कूल व त्यानंतर नगरपरिषद येथे सांगता समारोप करण्यात आला. सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. एन आय हायस्कूल व सेंट मेरीज हायस्कूलचे विद्यार्थी, नागरिक असे 125 जण सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या पैकी लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात  साहिल परेश वैवडे या मुलास प्रोत्साहन म्हणून सायकल देण्यात आली. या वेळी व नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्क्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, कौशिक शाह, राजेश ठाकूर, नगरसेविका यास्मिन गॅस, जानव्ही पंडीत, स्नेहल कासारे, दमयंती म्हात्रे, रजनी कोळी, आशा शेलार, तसेच दीपक दळी, कुणाल शिसोदिया, स्वच्छतादूत ज्योत्स्ना घरत, माय नॉलेज फाऊंडेशनचे नेहा राजेंद्र घरत, प्रियंका नाखवा, उरण नगर परिषद कर्मचारी आदींचे सहकार्य मिळाले. नैसर्गिक आपत्तीच्या अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. या सर्वाला वेळीच आवर घालण्यासाठी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आपण अनेक उपक्रम राबवित आहोत. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply