Breaking News

भाजप पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन पाटील

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन लक्ष्मणशेठ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्व. लक्ष्मणशेठ यांनी आपल्या सर्वांच्या हृदयात स्थान मिळवत प्रत्येकाच्या मनात आपलेपणा निर्माण केला होता तसेच प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास दिला, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले. (पान 2 वर..)
खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात गुरुवारी (दि. 28) झालेल्या नियुक्तीप्रदान कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद केणी, ज्येष्ठ नेते नारायण म्हात्रे, नगरसेवक विजय चिपळेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सचिन पाटील यांचे हितचिंतक उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, लक्ष्मणशेठ पाटील जे काम हाती घेत ते पूर्ण करण्यासाठी कटाक्षपणे लक्ष घालत. ते कायम तत्पर राहिले. त्यामुळे सर्वांच्या आधारस्थानी असलेले लक्ष्मणशेठ यांचा राजकीय वासरा पुढे चालवण्यासाठी सचिन पाटील यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply