Breaking News

कर्जत डामसेवाडीतील आदिवासींना दिवाळी भेट

कर्जत : बातमीदार

पनवेल कामोठे येथील निर्धार सामाजिक संस्थे तर्फे कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील डामसेवाडी येथील आदिवासी कुटुंबाना दिवाळी फराळासह कपडे, शैक्षणिक साहित्य, धान्य तसेच आकाश कंदिलचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी अनिल कुंभार, शुभम वाळके, कमलेश पाटील, रोहीत पाटील, निलेश आहेर, सुरेश झोरे आदींनी डामसेवाडीत जावून तेथील आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप केले तसेच वाडीमधील लहान मुलांच मनोरंजनात्मक खेळ घेऊन बक्षिस, खाऊचे वाटप केले. कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज अध्यक्ष भरत शिद, कर्जत नोकरवर्ग संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय हिंदोळा, वसंत ढोले, नांदगावचे माजी उपसरपंच राम खंडवी, तसेच मुंकूद हिंदोळा, आनंता खंडवी, गोपीनाथ गावंडा, यशवंत बांगारा यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply