Breaking News

पनवेल मनपा, स्वच्छ खारघर फाउंडेशनतर्फे योग दिन उत्साहात

पनवेल ः वार्ताहर

जागतिक योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका आणि स्वच्छ खारघर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथील सेंट्रल पार्क येथे योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

परिवर्तन आर्युयोगा वेलनेसच्या स्वयंसेवकांनी यावेळी योगाचे विविध प्रत्यक्षिक करून दाखवले, तसेच उपस्थितांना योगासने करण्यासाठी मार्गदर्शन केले. यापुढेही महापालिकेच्या कर्मचार्‍यांना मोफत योगा मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या वेळी महापालिकेचे कर्मचारी, स्वच्छ खारघर फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply