Breaking News

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ बुलंद तोफ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी खारघरमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ बुलंद तोफ तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (दि. 6) दुपारी 3.30 वाजता खारघर येथे भव्य जाहीर प्रचार सभा होणार आहे.
खारघर सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर होणार्‍या या सभेला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, रासपचे अण्णा वावरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी रविवारी (दि. 5) सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, देवांशू प्रभाळे, युवा मोर्चा खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील, सरचिटणीस अक्षय लोखंडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply