नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईस्थित संस्था होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने थंडीसाठी संरक्षण म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने 100 ते 150 गरजू मुलांना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. यासोबतच मुलांना खाऊही देण्यात आला. होपमिरर फाउंडेशन ही रमझान शेख यांनी स्थापन केलेली एक सामाजिक संस्था आहे, जिचा प्राथमिक उद्देश हा गरिबांना मदत करणे हा आहे. कोरोना काळात होपमिरर फाउंडेशनने हजारो वंचितांना रेशन, जेवण, ब्लँकेट्स, छत्र्या आणि कपड्यांचे वाटप केले. उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते सागर उथवाल यांनी स्वेटर वाटप मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल फाउंडेशनकडून त्यांचे आभार मानण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वंचितांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी फाउंडेशन उपक्रम आयोजित करीत आहे. यामध्ये फाऊंडेशन तरुणांना सहभागी होण्यासाठी आवाहन करीत आहे.