कर्जत : बातमीदार
नेरळ गावात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक आघाडी मोहाचीवाडी परिसर देणार, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या कर्जत तालुका उपाध्यक्षा वर्षा बोराडे यांनी व्यक्त केला. यावेळी श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मोहाचीवाडी भागात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महायुतीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी रॅलीमधील महिला कार्यकत्यार्ंनी नेरळ मोहाचीवाडीमधील अचानक नगर, शनीमंदिर परिसर, मुख्य वस्ती आणि नवीन वसाहत भागात घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांसमोर बोलताना भाजप महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष वर्षा बोराडे यांनी, मोहाचीवाडी भागात यावेळी महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष समिधा टिल्लू, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मृणाल खेडकर, आरपीआय आठवले गटाच्या महिला तालुका अध्यक्ष सुरेखा चिकणे, शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुख सुमन लोंगले, कर्जत पंचायत समितीच्या सदस्या सुजाता मनवे, नेरळ ग्रामपंचायतच्या सदस्य मीना पवार, रणरागिणी महिला मंडळाच्या पदाधिकारी सुवर्णा मोरे, वंदना वाघ, नेत्रा भौमिक, संध्या तायडे, मंगला राजभर, यास्मिन शेख, नाजिरा अनसारी, रेखा जाधव, हिरावती पाल, कर्मा पाल, सुनिता वाघमारे, भिमा बाई हिलम, पुष्पा जाधव, मथुरा वाघमारे, पार्वती जाधव, रेश्मा खान यांच्यासह शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थिती होते.
– महिला कार्यकर्त्या आणि गृहिणी यांचा प्रचार फेरीमधील सहभाग हा महायुतीच्या पाठीशी मतदार आहेत हे दाखवून देणारा आहे. मोहाचीवाडीमधील घराघरात महायुतीचे कार्यकर्ते निर्माण झाले आहेत, ही खासदार बारणे यांच्या विजयाची नांदी आहे.
– वर्षा बोराडे, उपाध्यक्षा,
कर्जत तालुका भाजप महिला मोर्चा