Breaking News

आप्पा बारणे यांना विक्रमी मताधिक्य द्या; भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे मतदारांना आवाहन

खोपोली : प्रतिनिधी

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन भाजपचे चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी थेरगावात प्रचारसभा झाली. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक निलेश बारणे, अभिषेक बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, काळूराम बारणे, तानाजी बारणे उपस्थित होते.

 आपल्या परिसरातील विकासासाठी सर्व मतभेद विसरायचे ठरविले. त्यानंतर बारणे आणि माझ्यामध्ये मनोमिलन झाल्याचे सांगत लक्ष्मण जगताप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे खासदारांचे मोठे संख्याबळ आवश्यक आहे. त्यांच्या मागे उभ्या राहणार्‍या खासदारांमध्ये आपल्यातील एक खासदार पाहिजे. त्यासाठी बारणे यांना विक्रमी मताने निवडून देण्यासाठी  सर्वांनी प्रयत्न करावेत.

 जगताप पुढे म्हणाले को, केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला. पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना, 24 द 7 ही पाणीपुरवठ्याची योजना शहरात सुरु आहे. केंद्र सरकार या योजनांना सहकार्य करत आहे.  खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारशी निगडीत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. खासदार निधीतून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणातील गाळ त्यांनी काढला. त्यामुळे जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यांची संसदेतील कामगिरी उल्लेखनीय असून सलग पाच वर्ष त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मतदारसंघाचा लौकिक वाढला आहे. नगरसेवक अभिषेक बारणे म्हणाले, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते मनापासून परिश्रम  करत आहे. थेरगाव परिसरातून महायुतीच्या उमेदवाराला सर्वांत जास्त मताधिक्य देण्यासाठी आम्ही प्रयत्ननशील आहोत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply