Breaking News

देवद ग्रामपंचायतीच्या सदस्यांची भाजपत घरवापसी

पनवेल रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या देवद ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश जुवेकर आणि सुनंदा रणखांबे यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले आहे. देवद ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश जुवेकर आणि सुनंदा रणखांबे हे पुन्हा भाजपवासी झाले आहे. काही कारणास्तव त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता, परंतु भाजपच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात सुरू असलेली अनेक विकासाची कामे आणि पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी देवद ग्रामपंचायतीच्या सरपंच शितल सोनावणे, सदस्य विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, वामन वाघमारे, अरुण वाघमारे, संदीप वाघमारे, प्रवीण वाघमारे, योगेश बनकर, गोरख गावंड, राम वाघमारे, प्रमोद रणखांबे आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply