मोहोपाडा : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती चितळे या काही कारणास्तव रजेवर गेल्याने सरपंपदाचा तात्पुरता कारभार पाहण्यासाठी भाजपच्या उपसरपंच यशश्री मुरकुटे यांना प्रभारी सरपंचपद बुधवारी (दि. 3) सोपविण्यात आले. यशश्री मुरकुटे यांची निवड होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर नागरिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. या वेळी माजी सरपंच विजय मुरकुटे, माजी उपसरपंच रवींद्र चितळे, प्रकाश माळी, भानूदास माळी, ग्रामपंचायत सदस्य नलिनी कारंदे, मुकेश पाटील, प्रमिला पाटील, राजेश सोनावणे, शेखर जाधव, सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर, बंडू मोडक, शंकर गोडिवले, चंद्रकांत पाटील, प्रभाकर गोडिवले, शिक्षक मंदार वेदक, उद्योगपती शैलेश म्हात्रे, वसंत मुरकुटे, हभप मोरे महाराज, बाळा चोरघे, महेश चितळे, पिंट्या जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विशाल मुरकुटे, मयुर मुरकुटे, मंगेश कारंदे, पवन चितले, पप्या सोनावळे, रवी भोईर, गणेश भोईर आदी उपस्थित होते.