Breaking News

उरणमध्ये डीपी उघडे; अपघाताची शक्यता; वीजवितरणचे दुर्लक्ष

उरण : वार्ताहर

उरण शहरातील कामठा येथील पंचवटी बिल्डिंगसमोरील व श्रीगणेश कृपा बिल्डिंगजवळील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण मंडळाचे डीपी सताड उघडे असून त्याकडे वीज मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे विजेचा शॉक लागून मोठा धोका होऊ शकतो. त्याकडे  गांभीर्याने लक्ष द्यावे व ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक

करीत आहेत.

उरण शहरातील कामठा परिसरातील रस्त्यालागत असलेली वीज वितरणाची डीपी उघडी असल्याने व रहदारीच्या रस्त्यावर डीपी असल्याने लहान मुले, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक या रस्त्याजवळून जाताना विजेचा शॉक लागून मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्याकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply