Breaking News

कर्जतमधील आदिवासी विद्यार्थ्यांना दिवाळी साहित्य आणि कपड्यांचे वाटप; मुंबईच्या नायगाव एज्युकेशन सोसायटीची दिवाळी भेट

कर्जत : बातमीदार

मुंबईतील नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यांमधील 500 कुटुंबाना दिवाळी साहित्य आणि 600 विद्यार्थ्यांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनानंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे हळूहळू शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी पुन्हा शाळेकडे वळू लागले असून त्यांना शाळेत टिकविण्यासाठी शिक्षक विविध माध्यमातून प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य आदर्श शिक्षक रवी काजळे यांनी नायगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि विश्वस्त रवींद्र रामचंद पाटील, सदस्य शिवाजी वामन, मनोज गोवेकर यांची भेट घेऊन मदतीसाठी विनंती केली होती. त्यानुसार सदर सोसायटीच्या माध्यमातून दिवाळीच्या पूर्वसंध्येला कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी, ऐनाचीवाडी, चिंचवाडी, वाघ्याचीवाडी, बांगरवाडी, वारे, वाघाचीवाडी येथील  प्राथमिक शाळेतील सुमारे 600 विद्यार्थ्यांना नवीन उत्तम दर्जाचे कपडे आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत साळवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. चाफेवाडी आश्रम शाळेचे अधीक्षक सचिंद्र पाटील, रमेश भुसाळ, शालेय समितीचे अध्यक्ष अनंत ठोंबरे, शिक्षक प्रदीप सैदाणे, मधू ठोंबरे यांच्यासह  ग्रामस्थ आणि विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply