Breaking News

पोलीस भरतीत कर्जतच्या पूनम ठाकरे हिचे सुयश

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील आसल येथील पूनम तानाजी ठाकरे  ही पोलीस भरतीमध्ये रायगड जिल्ह्यात तिसरी आली असून, या यशाबद्दल पूनमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आसल गावातील तानाजी ठाकरे यांची मुलगी पूनम ही डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत महाविद्यालयात क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असायची. तिने पोलीस दलात सहभागी होऊन जनतेची सेवा करावी, असे ठाकरे कुटुंबाला वाटत होते. पूनमने पोलीस दलाच्या परीक्षेत  उज्ज्वल यश संपादन करून रायगड जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply