Breaking News

काँग्रेस पक्षाची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी

नांदेड : प्रतिनिधी

काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे, जे दिवसेंदिवस बुडतच चालले आहे. काँग्रेससोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेससारखे मित्रही एकतर स्वतः बुडत आहेत किंवा काँग्रेसची साथ सोडून पळ काढत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा शनिवारी (दि. 6) नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. हे जहाज दिवसेंदिवस बुडत चालले आहे, तसेच राष्ट्रवादीसारखे काँग्रेसचे मित्रपक्षही एकतर बुडत आहेत किंवा काँग्रेसची साथ सोडून जात आहेत. काँग्रेसचे नेते आपापसात लढत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी दुबळी झाल्याने त्यांचे अनेक नेते निवडणूक लढवण्याऐवजी मैदानातून पळ काढत आहेत.

या वेळी पंतप्रधान मोदींनी वायनाड येथून निवडणूक लढवणार्‍या राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. अमेठी येथे पराभवाची भीती वाटल्यानेच राहुल यांनी वायनाड या सुरक्षित मतदारसंघाकडे कूच केली असा टोला लगावून आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करून मोदींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply