आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
कर्जत : रामप्रहर वृत्त
आर झुनझुंनवाला व लोटस फाऊंडेशन, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शास्त्रक्रिया आणि चष्मे वाटप गुरुवारी (दि. 11) आयोजित करण्यात आले होते. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील किरवली येथील साई शेळके मंगल कार्यालयात झालेल्या शिबिरात 346 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. 79 रुग्णांना मोतीबिंदू ऑपेरेशनसाठी नवीन पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर, सरचिटणीस राजेश भगत, संजय कराळे, उद्योजक किरण ठाकरे, अशोक ओसवाल, बळवंत घुमरे, बिनिता घुमरे, स्वामिनी मांजरे, विशाखा जिनघरे, स्नेहा गोगटे, सरस्वती चौधरी, उमरोली जिल्हा परिषद अध्यक्ष केशव तरे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष मिनेश मसने, शुभम बडेकर, संदीप मसने, राजेश ठाणगे, मनोहर मुकणे, केशव तरे, अनिल पाटील, जयवंत बोराडे, सोशल मिडीया सेल सहसंयोजक राहुल कुलकर्णी, सर्वेश गोगटे, जयेश भगत, हरेश ठाकरे, प्रकाश पालकर, अर्जुन भोईर, मयूर शितोळे, दिनेश सोळंखी, अंकुश मुने, मंगेश फुलावरे अनिल पाटील आदी उपस्थित होते.