Breaking News

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी पनवेलमध्ये

विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे करणार उद्घाटन

पनवेल : वार्ताहर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 14) सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे.

तर प्रमुख उपस्थिती भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांची असणार आहे. तसेच सभापती, नगरसेवक आदी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन कार्यक्रमानिमित्त संवाद कार्यक्रम पनवेलच्या वीर सावरकर चौक रोडवरील अशोक बागच्या विरुपाक्ष हॉलमध्ये होणार आहे.

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या कार्यालयाचे नूतनरूप अद्यावत करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply