खारघर : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या वतीने खारघरच्या सेक्टर 20 व 21मध्ये रविवारी (दि. 14) सकाळी 7 वाजता नाल्यातील तसेच रस्त्याच्या आजूबाजूला सुकलेल्या झाडांच्या फांद्या, कुडा कचरा, डेब्रिज उचलून व सफाईकरून परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
नगरसेवक प्रवीण काळूराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका सफाई कर्मचारी यांनी परिसर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी सेवा कार्याला उत्तम प्रतिसाद दिला. या वेळी खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक रामजी बेरा व रहिवाशी उपस्थित होते.