बंगळुरू : वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्यावर पंजाबचा कर्णधार आर. अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना अश्विन फलंदाजीला आला होता. त्या वेळी अश्विनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतरच्या चेंडूवरही अश्विनने मोठा फटका मारला. हा फटका षटकार जाईल, असे वाटत होते, पण कोहलीने सीमारेषेवर अश्विनचा झेल पकडला. झेल पकडल्यावर कोहलीने हाताने काही खुणा केल्या. त्या वेळी अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. अश्विनने आपले ग्लोव्ज मैदानातून बाहेर निघताना फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.