Breaking News

खारघर टोल नाक्यावर एसटी कर्मचार्यांना घेतले ताब्यात

पनवेल : रामप्रहर वृत्त

राज्यामध्ये एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहेत सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सातत्याने एसटी कर्मचारी असेल विविध संघटनेचे नेते करताना दिसून येत आहे. त्यातच खारघर टोल नाक्यावर प्रत्येक गाडीची तपासणी करून एसटी कर्मचारी असेल त्यांना ताब्यात घेतले गेले.

राज्यातले अनेक एसटी कर्मचारी मुंबईत हजेरी लावण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावरून जाताना दिसून येत आहेत, मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करून एसटी कर्मचार्‍यांना मुंबईत जाऊन घ्यायचे नाही यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. खारघर टोल नाक्यावर प्रत्येक गाडीची तपासणी पोलिसांकडून केली जात होती. त्यामध्ये एसटी कर्मचारी असेल त्यांना ताब्यात घेतले गेले. जवळपास 60 ते 80 एसटी कर्मचार्‍यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply