नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची गेल्या अनेक वर्षांपासून डेडलाइनवर डेडलाइन देणार्या सिडकोने आता पुन्हा अंतिम तारीख जाहीर केली असून तीन वर्षांनंतर म्हणजेच 2024मध्ये येथून विमान हवेत झेपावताना पहायला मिळणार आहे. सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांनी विमानतळाचे डिझाइन असलेले फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करीत त्यांनी 2024 साली पहिले विमान उडण्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबईजवळ पनवेल तालुक्यात सुमारे 24 हजार कोटी खर्च करीत हे विमानतळ उभे राहत असून वर्षांला 60 लाख प्रवासी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वापर करणार आहेत. दरम्यान, या विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीवर भूमिपुत्र ठाम आहेत.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …