Breaking News

‘यलो ब्रिगेड’ जोमात; तामिळनाडूच्या विजयानंतर अनोखी हॅट्ट्रिक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

येथील स्टेडियमवर रंगलेल्या सैयद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने विक्रमी विजेतेपद मिळवले. अखेरच्या चेंडूवर तामिळनाडूला 5 धावांची आवश्यकता असताना प्रतिक जैनच्या चेंडूवर शाहरुख खानने उत्तुंग षटकार लगावत संघासाठी विजयश्री खेचून आणली. तामिळनाडूच्या विजयामुळे एक अजब असा योगायोग पाहायला मिळाला. क्रिकेटच्या क्षेत्रात यंदा काही मोजक्या मोठ्या स्पर्धा झाल्या. सर्वांत आधी आयपीएल रंगली. या स्पर्धेत चेन्नईच्या संघाने विजेतेपद मिळवले. त्यानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने दमदार खेळ करीत विश्वविजेतेपद मिळवले. सोमवारी भारताच्या देशांतर्गत स्पर्धा असलेल्या सैयद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या संघाने बाजी मारली. योगायोगाची बाब म्हणजे या तिन्ही विजेत्या संघांची जर्सी ही पिळव्या रंगाची होती.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply