Breaking News

चौल मुख्य रस्त्याची साईडपट्टी धोकादायक

झाडे-झुडपे देताहेत अपघाताला निमत्रंण

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील चौल भाटगल्ली ते मुखरी गणपती मंदिर या मुख्य रस्त्यालगतची साईडपट्टी  झाडे, झुडपांनी वेढली गेल्याने अपघातास निमत्रंण ठरत आहे.

अलिबागकडून रेवदंड्याकडे जाताना मुखरी गणपती मंदिर ते चौल भाटगल्ली मुख्य रस्त्यालगत डाव्या बाजूस पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे गटार आहे. या गटाराच्या साईडपट्टीवर झाडेझुडपे उगवल्याने येथून जा-ये करत असलेल्या वाहनाच्या नजरेत रस्ता येत नाही. अंरूद असलेल्या या रस्त्यावरून एकाचवेळी दोन मोठी वाहने जात असताना साईडपट्टी न कळल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय एक मोठे वाहन येथून जा-ये करत असेल तर लहान चारचाकी वाहन चालकांनासुध्दा साईडपट्टीच्या झाडेझुडपांमुळे रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.

या रस्त्यातच चौल मुखरी गणपती मंदिरासमोर मुख्य रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे,  हा खड्डा येथून जाणार्‍या छोटया मोठया वाहनास त्रासदायक ठरत आहे. हा खड्डा चुकविताना चालकांनी नियत्रंण गमाविल्यास वाहन थेट गटारात जाऊन पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र संबधीत विभाग त्याकडे कानाडोळा करीत आहे. या रस्त्याच्या साईडपट्टीवर संरक्षक भिंत उभारणे गरजेचे असून संबधीत विभागाने त्वरेने लक्ष्य द्यावे अशी मागणी होत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply