Breaking News

बल्लाळेश्वर भाजपला कौल देणार

पाली नगरपंचायतीमध्ये कमळ फुलणार -आमदार प्रशांत ठाकूर

पाली : प्रतिनिधी

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अंगारक चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. 22) पालीतील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. बल्लाळेश्वराचा कौल भाजपच्या बाजूने असून नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत पालीमध्ये  ‘कमळ’ फुलणार असल्याचा विश्वास आमदार ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला.

काही दिवसांत पाली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार असून भाजप ही निवडणूक लढवणार आहे. आम्हाला भाजपच्या माध्यमातून पालीतील जनतेची सेवा करायची आहे. त्यासाठी आम्हाला संधी, बळ आणि आशीर्वाद दे, अशी प्रार्थना बल्लाळेश्वराकडे केली. बल्लाळेश्वर भाजपच्या बाजूने नक्कीच कौल देईल, असे आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले. 

भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस अविनाश कोळी, मिलिंद पाटील, महिला मोर्चा दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैशाली मपारा, सुधागड तालुका अध्यक्ष आरती भातखंडे, योगिनी भातखंडे, तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, सरचिटणीस सागर मोरे, पाली शहराध्यक्ष उमेश मढवी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन दगडे, सरपंच शरद चोरघे तसेच प्रसाद लखिमळे, भाऊ गांधी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply