पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा झाला. याचेच औचित्य साधून चिंध्रण येथे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून तयार झालेल्या काँक्रिट रस्त्याचे आणि चिंध्रण ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या गटारांच्या कामाचे उद्घाटन तसेच स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 23) झाले. या कामांचा शुभारंभ अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष आप्पा भागीत, नामदेव जमदाडे, नरेश पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कैलास मढवी, अंकुश पाटील, शिवाजी दुर्गे, सागर भोईर, रवींद्र पाटील, लक्ष्मण कडू, सरपंच कमला देशेकर, उपसरपंच इंदिरा पाटील, अनंता कडू, भगवान कडू, राजेंद्र पाटील, हरिश्चंद्र पाटील, माजी सरपंच मंदा देशेकर, बाळकृष्ण पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी ग्रामपंचायत कार्यालयात अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच शांतीवन येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या उपस्थितीत झाले.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper