कर्जत : बातमीदार
भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर अभियान रॅलीचे कर्जत शहर आणि नेरळ गावात स्वागत करण्यात आले. कर्जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे तर नेरळ गावातील हुतात्मा हिराजी पाटील चौकात या रॅलीचे भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी राज्यातील ओबीसी आरक्षण वाचावे आणि ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी ओबीसी आरक्षण जागर अभियान रॅली काढली आहे. या रॅली दरम्यान, ओबीसी समाजासाठी भाजप सरकारने काय केले, याची माहितीपत्रके वाटली जात आहेत. तसेच भाजपच्या नेत्यांनी केलेल्या भाषणांची ध्वनीचित्रफीत दाखवली जात आहे. कर्जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रॅली पोहचली त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेरळ येथे भाजप आणि ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीचे जोरदार स्वागत केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हुतात्मा हिराजी पाटील आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, उपाध्यक्ष सचिन म्हसकर, सरचिटणीस संजय कराळे, युवानेते किरण ठाकरे, नितीन कांदळगावकर, संदीप म्हसकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दशरथ वेहले, दशरथ पोसोटे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, सरचिटणीस प्रकाश पालकर, नगरसेविका स्वामिनी मांजरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे यांच्यासह योगेश ऐनकर, निखील ऐनकर, प्रकाश पेमारे, मारूती जगताप, दिनेश भरकले, अनिल पटेल, प्रवीण गायकवाड, हर्षल कुलकर्णी, हेमंत मेस्त्र, प्रज्ञेश खेडकर, राहुल मुकणे, अक्षय पेमारे, कौस्तूभ टिल्लू, पप्या जैन, उमेश भागीत, प्रणित ढोले, गमन ऐनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.