Breaking News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज मोहोपाड्यात सभा

पनवेल : प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी, (दि. 26) सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथे केंद्रीय मंत्री विकासमूर्ती नितीन गडकरी यांची ‘विजय संकल्प सभा’ होणार आहे.

अचानक मैदानावर होणार्‍या या सभेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, केंद्रीय मंत्री अनंत गीते,, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गडकरी यांची जिल्ह्यातील ही दुसरी जाहीर प्रचार सभा होय. यापूर्वी अलिबाग येथे त्यांनी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. सभेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी सभेच्या तयारीची पाहणी केली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply