Breaking News

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला आदरांजली

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफवर्कर अरुण घाग, विद्यालयाचे उपप्राचार्य पी. पी. मोरे, पर्यवेक्षक आर. एस. साळुंखे, रयतसेवक संघाचे समन्वयक एन. एच. शेख व सर्वसेवक वर्ग उपस्थित होते. तसेच यशवंत घरत, अशोक पाटील, बाबुराव मढवी, सुभाष घरत, संजय ठाकूर आदी उपस्थित होते.

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे सोनवारी (दि. 6) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

विद्यालयाचे प्राचार्य एम. एच. पाटील, उपमुख्याध्यापक व्ही. एल. नरवडे, पर्यवेक्षक एस. जी. म्हात्रे, ज्युनिअर कॉलेज प्रमुख व्ही. के. कुटे, आर. एन. पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख एच. एन. पाटील, दर्शना माळी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी ज्युनिअर कॉलेज आणि माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. इयत्ता नववीच्या वर्गाने हा कार्यक्रम साजरा केला.

प्रतिमापूजनानंतर प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गात हा कार्यक्रम साजरा केला. या वेळी त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याची माहिती सांगितली.

नवी मुंबई : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत यांच्या आदेशाने नवी मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाहीर अभिवादन करून आदरांजली अर्पण

करण्यात आली.

भाजपच्या दारावे येथील पक्ष कार्यालयात माजी नगरसेवक सुनील पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपासक दादाराव सुरवाडे, भीमराव लोणारे, नथुराम बनसोडे, बबन कदम, मंगल वाघ, सुरेश परब, विक्रांत गवारे यासह बौद्धजन समितीचे उपासक उपस्थित होते. भाजप आयकर कॉलनी आणि धम्मदीप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समाज मंदिर हॉल येथे बौद्धाचार्य सूर्यकांत बोधी यांच्या उपस्थितीत  महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. पंचशील पालनाचा अभाव जाणवत असल्याने प्रत्येक उपासक-उपासकाने बौद्ध धम्म दीक्षा घेऊन एक आदर्श बौद्ध समाज घडवला पाहिजे, असे विचार आपल्या  प्रवचनातून सूर्यकांत बोधी यांनी मांडले. या वेळी उपासक पंजाबराव हरले, एम. डी. कांबळे, भीमसेन तपासे यासह आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

नेरूळ सेक्टर 11 मधील भाजप कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या वेळी माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, विकास सोरटे सह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या वतीने सुभाष गायकवाड यांच्या उपस्थितीत भव्य कँडल मार्च काढून आदरांजली अर्पण करण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply