Breaking News

कर्जत न. पच्या वतीने गटार बांधकामाचे भूमिपूजन

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत नगर परिषद क्षेत्रातील पश्चिम भागात असलेल्या गुंडगे परिसरात फॉरेस्ट ऑफिस ते कलश बिल्डिंगपर्यंतच्या गटार बांधकामाचे भूमिपूजन  नुकतेच नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते झाले.

नगर परिषदेच्या फंडातून सुमारे नऊ लाख 37 हजार 502 रुपये खर्च करून फॉरेस्ट ऑफिस ते कलश बिल्डिंगपर्यंत गटाराचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे, पाणीपुरवठा सभापती राहुल डाळींबकर, शरद लाड, नगरसेविका पुष्पा दगडे, मधुरा चंदन, प्राची डेरवणकर, सुवर्णा निलधे, भारती पालकर, नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, विवेक दांडेकर, माजी नगराध्यक्ष सुनंदा कांगणे, कार्यालयीन अधीक्षक अरविंद नातू, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार, रवींद्र लाड आदींसह गुंडगे परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply